पण माझ लक्ष फक्त तिच्या मुठ वर होत…

img_20150510_184653

आज परत घायाळ झालो शंतनू च गाण दिवसभर ओठांवर राहील ‘जातीअंताची घोषणा अन तिची मुठ वळावी’… तिची मुठ भयानक होती.

तिच्या आजूबाजूला जयभीम ओठांवर येताच थोंड बनवणारयांचा घोडका होता,
पण माझ लक्ष फक्त तिच्या मुठ वर होत…
संधीसाधू पण होते, पण मी तर तिच्या जातीअंताच्या घोषणेवर फिदा होतो..
आजूबाजूची अराजकतेवर तीच गाण धावा बोलत होत
आणि तिचा आवाज मला आतून खोकला करत होत…
ती म्हणत होती जय जय जय जय जय भीम, फुले शिवाजी भगत सिंघ
मी म्हटल, अबे तू थांब आधी, माझा जीव घेसील का? एवढे अदाए दाखवून, मनातल्या मनात
एक दोन दा नजर पण भेटली, पण पाहिजे ते बोलण झालं
तिने शिवी घातली, नालायक आहेस तू
आणि मी तू बरोबर बोल्तेहेस चा सूर दिला
काफिर होतो मी तिच्या नजरेत
मी माझ्या खुदाला replace केलं तिच्याने
पण सोबत गर्दी होती
half-feeded, अप्परमिडल क्लास साला वैताग आणत होता..
थंड-बधीर होते.. काहीही घोषणा देत होते..
त्यांच्यातलं ‘unconscious investment’ मी ओळखून, धुव्वा उडवत होतो…
परत जातीअंताची घोषणा एकून
जागेवर आलो, अन परत मी गुमनाम झालो, तिच्या बेधड़क, निडर, प्रखर आवाजात
‘हाय तौबा’ आवाज है उसका
पूरा मार डालती वो
नुसरत भाई भी याद आ गए इस दौर में
न सजदे में दिल, ना ईबादत में दिल है
बस आजकल तो बगावत में दिल है
तेरी वजह से
मुँह फेर बैठे हैं अपने ख़ुदा से
मेरे नैना काफ़िर हो गए
तेरी गलियों के मुसाफ़िर हो गए

Image | Posted on by | Leave a comment

तस्वीर

तस्वीरे मुश्किलें है, नाज है या है शबाब?
चढ़ा, उतरा और बहका
समझ आये तब तक, तस्वीर चला मेहेक.
कभी जा, कभी हा, कभी ना. पल है तस्वीर.
खुनी भाई भी कहते है, आ जी ले एक पल में सौ जनम.
पल सयोंजित है, मोहित है, सर आँखों पर.
तेरी, उसकी और सबकी.
बस.. तस्वीर रह, तेरी भी लाल मेरी भी लाल.

Posted in In TISS | Leave a comment

t-shirt आधुनिकता आणि स्तोम माजवण्याच राजकारण, थोडक्यात.

t-shirts वरती फोटो असणे हे आधुनिक असण्याचं लक्षण म्हटले जाते. त्यात वेगवेगळ्या लोकांची मते आणि  विधानं छापून येणे सुद्धा आधुनिकताच आहे, असहि म्हटलं जात. असले t-shirts घालणे, शक्यतोवर महाविद्यालयीन गोतावळा मध्ये जास्त आहे. गावा-खेड्यात अन शैक्षणिक शिक्षण न घेणाऱ्या जनतेकडे कमी असत. असही म्हटलं जात कि, शिक्षणाद्वारे आधुनिकता येत असते, आधुनिकतेचे लक्षणं आणि आधुनिकतेचा मार्ग हा भांडवली होत आहे. पश्चिमात्य देशात आधुनिकता हि वर्तवणूक आणि fashion याद्वारेच आहे. बऱ्याच गोष्टी आणि समज याला धरूनच समोर येताना दिसतो. अंद्रू रॉस, अमेरिकन प्रोफेसर याला ‘Americanization’  (अमेरिका काय आहे? सांगणे गरजेचे वाटत नाही) म्हणतो. महापुरुषांचे विधानं, त्यांचे फोटो आणि भांडवलधारी व्यवस्थेचे मिसळवणूक कशी होत आहे आणि त्यातन सध्या घडणारी जी नवीन (?) पिडी यातन काय घेतंय तो वादाचा पण मुद्दा आहे. पण t-shirts वरती फोटो, विधानं आणि मत छापून येणे यात भांडवली व्यवस्था स्पष्टपणे गोतावळ्यावरती वर्चस्व गाजवेल, गाजवतेय. या सगळ्या आधुनिकतेला हेबरमास एक अपूर्ण प्रोजेक्ट म्हणतो.

माल्कम x एकदा म्हटला होता, ‘कुठल्याही तत्वाला प्रतीकांची (symbols) गरज असते. ती फक्त गरज उरत नाही, तर ओळख बनते, अन ओळखी भांडवली व्यवस्थेला धक्का देत असतात. न कि व्यवस्था भक्कम करण्यासाठी भर देतात’. या अहुलीयाचच फोटो t-shirts वर छापून भांडवलजाद्यांनी माल्कम x नावाचं भांडवल केल.

शिवाजी राजेंनी साक्त राजेपनाचा दावा केला, ब्राम्ह्ण्यांनी त्याला धावणीला बांधलय, जस बैलाला बांधतात तस. आज शिवाजी ‘गो-ब्राम्हण प्रतिपालक असून’, त्याच्या नावे कत्तली चालल्या आहेत. शिवाजी राजेंचा फोटोसोबत t-shirts वर जगदंब, स्वराज्य, होय मी हिंदूच, क्षत्रिय अन वाघाचे पिले असे बरेच काही लिहिलेले दिसते. शिवाजी मराठ्याची जात असहि कधी कधी लिहलेले दिसून येते. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, अशाही काही वल्गना आढळून येत असतात. त्याचा बाजार असतो. भांडवलहि असतेच.

बाबासाहेबांची जयंती त्यांच्या जिवंतपणी काढण्यात आली, त्यांनी या गोष्टीला विरोधही केला, पण आम्ही कसे चांगले अनुयायी आहोत दाखवणे पात्रतेचा भाग बनतो, तेव्हाही बनला. सिद्धार्थ ने मूर्तीपूजा व्हायला नको याकडे ‘जातीने’ लक्ष देवून, अनुयायी घडवलेत. आनंद ने अनुयायी पणाची कास न सोडता बुद्ध धम्म पोचावाण्यासाठीचा जो काबाडकष्ट आहे, वाखणण्याजोगे आहे. पण सिद्धार्थ आज काय आहे? पुतडा अन विहार.

तुकारामाची गाथा जेव्हा बुडवली, कुणी इंद्रायणी नव्हती आली; ती गाथा वाचवण्यासाठी एक कोळी धावून आला, त्या कोळ्याने ती बाहेर काढून ‘preserve’ केली, जर शंका असेल तर ‘क्रांतीबाचा’ शिवाजी वाचा. पण आज ग्यानबा-तुकाराम, विठू-रुखमाई अन पंढरपूर पुरता मर्यादित तुका दिसतो. जत्रेच भांडवल तर आहेच, गाथेचा फोटो हि आहे, t-shirts वरती.

लोकांमध्ये राम किवा अजून इतर भगवानांची t-shirts घालण्याची पण सवय आहे, पण राम आणि इतर भगवान वाले तेच म्हणत आहे कि, विचार न करता घालून बैलांसारखे मान हलवणे. संभाजी भगत चं गान आठवत, ‘सिलिकॉन कि व्याली मे भाई, सियाराम का मार्केट है भाई’.

आताचा काळ हा उत्तरो-आधुनिक (post-modernists) आहे, त्यात वेगवेगळ्या सांस्कृतिक अर्थव्यवस्था हेतू पुरस्सर पसरत असून त्यात त्यांचे विशिष्ट प्रायोजने, जे अविकसित देशांसाठी घातक, आणि उद्देशांपासून दूर खेचणे वाटते, मला तरी. भारतातलं त्यातही त्यात महाराष्ट्रंच उदाहरणं हे जिवंत असायला पाहिजे, बाबासाहेब, शिवाजी, संत तुकाराम आणि माल्कम x ला हेतूपुरस्पर उत्तरो-आधुनिकतेच्या नावाखाली घातलं जात.

पण मला वरील सगळं ‘अकारण स्तोम माजावण्या’ व्यतिरिक्त काहीच वाटत नाही. ब्राम्हणाच आणि भांडवलदाऱ्याच एक रूप जे मला समजलंय; ते कुठलीही गोष्ट आधी निर्माण करतात, ती कितीही वाईटातली वाईट काहून असेना तिचा खप वाढावा म्हणून लोकांना ‘लावून देतात’. लोक बिच्चारे अंध आणि वरून श्रद्धाळू, मागचा पुढचा विचार न करता त्याच गोष्टीची चर्चा-debate-सेमिनार-conference-जाहिराती-tvप्रोग्राम-radioप्रोग्राम-प्रिंट प्रसारमाध्यमान द्वारे वाईटातली वाईट गोष्ट  बहुजनांपर्यंत (mass) पोचवतात. बहुजन हि विचार न करता (विवेकच चोरीला गेला आहे, विचार कुटून करणार) ती वाईटातली वाईट गोष्ट आपल म्हणून घेतात. आधुनिकतेच्या नावाखाली चंगळवाद-बाजारवाद ज्याला म्हणता येईल, तो बहुजन फोफावत असतात, आणि ‘विचारही विकले जातात’ याची ग्वाही विश्वासाने देत असतात. ‘Western modes of modernity’ भारतातल्या जातिव्यवस्थेत मिसळली. अस म्हणता येईल कि आधुनिकता हि t-shirts द्वारे आहे, ना कि विचार, शिक्षण आणि मतांद्वारे.

सूचना – माझ्याकडेही एक ‘rastafari’ च t-shirt आहे, म्हणून मी कोणी या सगळ्या गोष्टी समजलेला गुणी मुलगा नाही.

Posted in In TISS | 2 Comments

व्यक्तिवादी ‘counter narratives’.

सवर्णांवरती जोपर्यंत प्रतिबंधात्मक सांस्कृतिक कायदा त्यांच्या अत्याचारित कृतीला आडा घालण्यासाठी केला जाणार नाही, तो पर्यंत ‘तुझ्या-माझ्या’ Intellectuals भौगोलिक कारणांना (urban-rural धरून) dialectic करत राहणार. ‘तू आणि मी’ खूप कमी आहेत. खेड्यापाड्यात अजूनही minorities मध्ये ‘गोचीत’ अडकलेल्यांची संख्या जास्त आहे. ‘तू आणि मी’ बाहेर पडून (?) identical dignity थोडीसी जपून ठेवली आहे. ‘भाड्खाऊ, मी कमवतो, मी खाईन, जे मला ख्यायाच आहे ते. तू कोण बोलणारा?’ या अर्थाने identical dignity बोलतोय मी. उरला देशीवाद, व्यापक असेल तर खूप obvious आहे, कोसलाच्या पल्याड जातोय.

मी ज्याही खेडा पाड्यात गेलोय, त्या प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिकेतील पूर्ण काळ्यांचा लढा दिसतो. मांग्वाडा, महारवाडा, कुंभारवाडाच्या रुपात. जागतिकीकरण, चंगळवाद, भांडवलधारी व्यवस्था विरुद्ध देशीवाद होवूच शकत नाही. या उलट म्हणायला हरकत नाही जागतिकीकरण+चंगळवाद+भांद्वाल्धारी+सरांजाम्धारी=देशीवाद, असं दिसतं. बाबासाहेब भारतीय खेड्यातील मास च्या बाबतीत म्हटले होते, ‘याच्यातन जात निघाली कि हे जगातील सगळ्यात सुंदर प्राणी आहेत, पण जेव्हा यांची जात यांच्यात असते, सगळ्यात जास्त हिंस आणि अमानवी हेच असतात’, मग ते खेड्यात असो किवा शहरात same.

मुंबईचा देशीवाद सांगू का???? ट्रेन मधली गर्दी मंदिर आल कि जोर जोराने आरोळ्या मारतात. म्हणत्यात, गावाची आठवण येते.

देशीवाद सामंतशाही ची देण आहे. बऱ्याचदा, खेड्यातले उदाहरण दिले तर ‘दलित हे हिंदूच असेच म्हटले जाते’. (सगळ्याच ठिकाणी Actually) पण historically, दलित हे हिंदूचे rivalry राहिले आहेत. देशीवाद संपूष्ठात येतो मग.

पण, एक hypothesis द्यायला घेतले तर दलित देशीवाद काय असू शकते तर मी म्हणेन आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या पंगु झालेल्या खेड्यांना high culture आणि low culture च्या भानगडीत पाडण होईल, अन मग ते आपोआप Jacques Rancière च्या Identity as ideology अन poverty च्या व्याखेविरुद्ध जाइल.

Disclaimer – मी नेमाडेंच कोसला वाचलेलं नाही. माझी समज देशिवादाची Nativism ने आलेली आहे.

Posted in In TISS, Rada | Tagged , , , | Leave a comment

जनतळ

जनतळ
कपाळी हानिलाय भरघोष अपमान
तरी तू उभा, काटीच्या वेलीसारखा
तुला संपवण्यात झालीया दमछाक
उडालेत यांचे अकेलेचे तारे
अन भिडल्या त्या बामणी जंजाळात
मग काय
जनतळ ठरवण्यातच वेळ जात राहिला
कधी जनतळ लाल त कधी निळा
भगव्याला थारा कुशीतच
जनतळ
जगेंगे तेरे लिये मरेंगे तेरे लिये
भले तो लाल राहो मग निळा…
तोपर्यंत
गान ऐका
सून मेरे भैया नि अब्दुल मिया
झुरस न मन मा, झुरस न मन मा.
याद उसकी आती है
दिल को यु डराती है
सपान में आके वो दिल को
कावरा बावरा करती है….

Posted in Poem | Leave a comment

शांताबाई

शांताबाई ~ तेरा है जलवा
माहीम चा हलवा
जीवाचा कालवा
मनाला भुलवा
मामाला बोलवा
कालवा-हलवा कालवा-हलवा
यात अश्लीलता काय आहे?? अश्लीलता तर ‘त्यांच्या’ बुद्धीतच आहे. कधी Porn बंद, कधी Beef बंद, आम्ही शुद्ध शाकाहारी, माणुसकी मानता न मग प्राण्यांना का मारता म्हणणारे, प्राण्यांनी नुसता मुतल पण तर त्या प्राण्याला घरातन बाहेर काढणारे, हे अस्सल सवर्ण-ब्राह्मीन, कळत-न कळत कधी बहुजन विरोधी बनतात अंदाज नाही. संजय लोंढे तसा बहुजन नसून दलित आहे. हा प्रश्न अश्लीलतेचा मुळीच नाही. प्रश्न Structural Power चा जो ‘ते’ मागत नाहीये, तर हिसकावून घेत आहेत, घेतलेत. झोपडपट्टी च्या लोक कलावंत पट्ट्याला विनाकारण छळणार आणि त्याचीच कलाकृती ‘ते त्यांच्या’ नावावर करतील आणि मस्त Profit कमावतील. लावणीच पण तसच झालय न!! आधी ते TV वर न्हवतो तेव्हा Low Culture, अश्लील, TV वर आल आणि त्यांच्या ‘पोरी-बायका’ (Let’s talk about sexuality वाल्या) नाचायला लागल्या तेव्हा म्हणे हि कलाकृती Preserve व्हायला पाहिजे. आनंद शिंदे च गाण, ‘जेव्हा नवीन पोपट हा’ ‘चल रे लक्ष्या मुंबई ला’ मध्ये घेतलं, तेव्हा कुठे त्याच्या वरच अश्लीलतेच रडगाण कमी झाल, पण ‘चल रे लक्ष्या मुंबई ला’ माहित नसणारे अजूनही या गाण्याला अश्लीलच म्हणतात. अवधूत गुप्ते आणि अनुराधा पौडवाल मस्त उदाहरण हे या साठी. आनंद शिंदे दमदार गायक, संगीत कार असून सुद्धा त्याला आजही एका एका गाण्यासाठी फिरावं लागत. सांस्कृतिक लढा काय असू शकतो? आणि ज्या कलाकृतींना अश्लील म्हटलं गेलंय, जर पडताडून पाहिलं तर लक्ष्यात येईल. आपण पण कुठे तरी कमी पडलोच हे.

~ जयभीम
https://www.youtube.com/watch?v=IYqGOsnSCJM

Posted in Music | Leave a comment

तुका-चार्वाक जिंदाबाद

भारतीय दर्शनातील बुद्ध, चार्वाक आणि महावीर यांची धारणा लोकप्रिय असून सुद्धा यांच्यावर ब्राह्मण तत्वांनी विजय मिळवलेला दिसतो. परलोक, आत्मा, श्रद्धा, यांना स्थान न देणारी विचारसरणी परंपरा, ईश्वर, अस्तित्व यात अडकलेला आहे. चार्वाक तर वेदांना धूर्त म्हणून अवैदिक परंपरेला केंद्रस्थानी ठेवून नीती स्वताच स्वयंपूर्ण, असेही म्हणतो. एका युगाचा प्रतिनिधी तुकाराम अवैदिक परंपरेला आणि समस्थ मानव जातीला संबोधून म्हणतो कि,

रे रंजले, गांजले
त्यासी म्हणे अपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेचि जाणावा

गोर गरीब, पिडलेले, छड्लेल्यांना ओळखनाराच चार्वाकाची नीती आणि अवैदिक्ता दाखवत असते. तुकोबा जेवढा शुद्र ती शूद्रांचा होता, तेवढा ब्राह्मणांचा कधीच न्हवता. मराठा-कुणबी अंध पणाने तुकारामाची पूजा अर्चा करतात, त्याच प्रकारे चार्वाकाची करत नाहि. त्यात युगाचा हि फरक, आणि जगण्याचाही, चाली ढालीचाही. मराठी-कुणबी सुधारलेत म्हणून पूजा-अर्चा करतात’, अस म्हटलं तरी वावग नाही. पिडलेले, शोषित मराठा-कुणबी पण त्याला कारणीभूत भारतात झालेल्या प्रतीक्रांत्या आहेत. भारतात झालेल्या बहुन्तांशी प्रतीक्रांत्या या ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय होत्या, त्याचा परिणाम शुद्रांवर झाला आणि शूद्रांना अस्पृश्यता न्हवती (तसी ती कुणालाच नकोय..) म्हणून ते वैदिक रित्या नीती गहाण ठेवून पूजा अर्चा करू लागले. अत्मापिडीत तुकोबा अपभ्रंश होत होत मूर्ती-व्यक्तीपुजेचा ‘संत तुकाराम’ झाला. तो पर्यंत नास्तिकवादी चार्वाक चर्चेतन, मौखीक्तेतन बाद झाला, गायब झाला.
चार्वाक तुकोबा जातीधर्मा पलीकडे चिंतन करतात, तर तत्कालीन कोंडी फुटते. पण प्रतीक्रांत्या आहेतच. बाबासाहेब म्हणून गेलाय, ‘चार्वाक तुकोबा प्रंचड ताकदीचे आणि युद्धखोर आहेत’.
युद्धखोर-बंडखोर तुका, चार्वाकाची ‘नीती’ या संकल्पनेला समोर ठेवून

“पापाची वासना नको दावू डोळा
त्याहुनी आंधळा बराच म”

तुका-चार्वाक जिंदाबाद!!
थोड अवांतर – समकालीन काळात पाप, वासना आणि आंधळा आलय म्हणून जनता ‘sexuality’ बाबतीत लिहिलंय अस म्हणतील.

26th January 2016

Posted in Rada | Leave a comment

थोपव

थोड विषयांतर होईल पण बोलावस वाटतंय. एकदा भैय्या भो म्हणाले होते, “biaseness सोडून बाबासाहेबा इतकाच कार्ल मार्क्स ला नमलो पण उच्चवर्गीय संवेदनांना आम्ही बळी पडत चाललोय. उच्चवर्गीय कॉम्रडेस हे जेव्हा त्यांच्या नेणिवेतील जात दाखवायला लागतात, त्यावेळेस खूप वैषम्म्य येते”. वरील चर्चा मला भाई संगारे, विलास घोगरे आणि पोचीराम कांबळे ची आठवण करून देतय. शहीद, martyrdom, symbolized fascism सगळ ठीक आहे हो, पण ‘thought without action is always unproductive’ च काय? वरील तीघ दलित हे कृती करतानाच मेलेत. प्रश्न उभे राहताहेत कौताकास्पद आहे. पण एकत्र होण्याच्या अगोदर middle-caste/class संवेदना कार्यकर्त्यांवर थोपवणे कितपत योग्य आहे?

Posted in Rada | Leave a comment

आवाज वाढव dj तुला आईची शप्पथ आहे’

सकाळची वेळ, गारठलेलं जीन, तरी सुद्धा शाळेत जाणारे पोर, अंधाधुंद मस्तीत, आवाज करीत निघालेत. थंडी काही करेना निघतच न्हवती अन अंघोळीला दोन दिवस झालेले तेही ऑफिस मधल्या लोकांनी ओळखलं होत. ग्राम पंचायती हून अंघोळीच ठिकाण थोडं लांब… त्याच कडेला माध्यमिक विद्यालय… माझे पार्टनर ‘एक बादली, एक मग तो पण बिसलेरी पाण्याच्या बॉटल ला अर्ध तोडून बनवलेला, एक हाप्का (अभिजन भाषेत ह्यांडपंप म्हणतात त्याला…) एक लाइफबॉय साबण बस.. टॉवेल मी खांद्यावर जसा मयतीला घेतात तसा टाकलेला अन धावत सुटलो अंघोळीच्या ठिकाणी, पण एवढ धावूनही थंडी काही निघत न्हवती. हाप्काचे पाणी सरळ विहिरीतन म्हणून अजून थंड… अंघोळीला मनच करत न्हवत… १० मिंट बसलो अन विचार केला.. आंघोळ कराव कि नाही? पण कराव लागणारच होत.. अन थंडी निघायचं नावच घेत नाही… धावणे टाळल…
असहि मोबाईल मधले गाणे चालूच होते.. suffle on होत म्हणून गाणे पण व्यवस्थितच लागत होते. लागलं ना भाऊ.. शिंदेशाही तोडा ‘आवाज वाढव dj तुला आईची शप्पथ आहे’. पाय फिरकले.. अन थंडी पण निघायला लागली.. खूप नाचलो.. थंडी निघालीच.. रस्ता एवाजावीचा न्हवता म्हणून मोकळ नाचू लागलो होतो.. दुसऱ्यांदा लावलं.. मज्जा आली..
नाचतांना एक गोष्ट विसरलोच.. exact समोर शाळा होती, सकाळची वेळ, शाळा पूर्ण भरली पण न्हवती.. गौरव ने बघितलं पण मला नाचतांना!! कारण त्यालाच माहिती होत, मी अंघोळीला येतो.. मी नाचतांना पाहून शाळेतल्या पोरांना त्याने बोलवून घेतलं होत. सकाळीच वेळ म्हणून मोबाईलचा आवाज पण पुरेशा होता, त्यांना पण एकू जात होत..
‘once more’ एकू आलं, मी लाजलो.. आणि माग वळून पाहिलं तर, ५०-६० पोरा-पोरींचा घोडका बघत होता, हसत होते.. आणि चिळवत होते, ‘ए dj’, ‘आईची शप्पथ’, once more’, ‘मुमै वाले साहेब’, ‘नाचा अजून नाचा’… मी थोडा वेळ घाबरलो, पण सगळ्यांनी माझा नाच एन्जोय केला बघून तो डर पण निघून गेला… मी आवाज दिला ‘उद्या नाचेन याच वेळेला आता वर्गात जा’… काही पोर तर झाडाखाली येवून उभे होते, तिथन अजून जवळ होत माझ ‘bath taking place’. पोर गेले मी अंघोळीला शुरुवात केलि, तेच गाण रिपीट केलेल पण!!
कामाला लागलो अन दोन दिवस असेच निघाले, तो पर्यंत त्या शाळेच स्नेह संमेलन आलं.. सरपंच साहेबीन मला घेवून गेलेली तसी शाळेतल्या शिक्षकांचं पण म्हणणं होत मी ते attend करायला पाहिजे.. पोर मध्ये मध्ये dj dj बोलतच होते, पोरी पण तेवढ्याच पुढे, dj dj बोलायला.. निवेदकाने म्हटलं ‘dj dj काय लावलंय?’ पण त्याला पण कुठे माहित…
पोरां-पोरींनी मस्त सादर केलेत.. dance, act, eve-adam teasing… मज्जा येत होती.. मध्येच मुंबैच्या साहेबाला बोलायला उठवतात.. मार्गदर्शन करा म्हणून.. कला आणि साहित्यच बोललो… संपवलं तस टाळ्या आणि dj dj आवाज…
शेवटच गाणं संपल ‘राधा तेरी चुनरी’ दहावीच्या पोर्रिनी सादर केल होत…
निवेदक म्हणाला.. आपण सामुहिक नाच करायचा आहे.. सगळेच खुश आणि ‘एकच कल्लोळ dj dj’. निवेदकाला अजूनही नाही कळल काय हे dj dj.. तो समजावत होता dj नाही आपल्याकडे, शांताबाई लावूया म्हणून.. एक पोरगी ने मोबाईल काढला, ‘इथे आहे dj’… पूजा तीच नावं, दहावीच्या वर्गात ती, त्यांच्या घरातन मला ख्यायला जेवण येत होत.. मेस लावली होती.. पूजा ने सिस्टम चं plug मोबाईल ला लावला.. गाण लागलं, मी खूप लाजलो, सगळे सामुहिक रित्या नाचत होते, आणि तीच स्टेप जी मी माझी थंडी काढण्यासाठी वापरली होती, ते तेवढ बरोबर नाही करत होते, ती स्टेप.. पण ठीक हे.. पोर चीळवत होते मला, मी एन्जोय करत होतो.. गौरव ने मला ओळण्याचा प्रयत्न केला, शिक्षक खेकसले.. मी म्हटलं, ‘मला पण नाचायचं आहे’.. पोरांनी गोल रिंगण केल, मी आत आणि ‘आवाज वाढव dj तुला आईची शप्पथ आहे’, दुमदुमल…
(नागपूर जवळ असतानाचा किस्सा..)

Posted in Random Thoughts | Leave a comment

कह दिया होता

Khopoli

बस कह दिया होता मर जाओ.
मर भी जाते, पलट के हंसने की क्या
जरुरत थी.
अब तो हर पल, पल पल मर रहे है.

कल की लायने आज ट्रेन मे फीट हुयी.

Posted in In TISS | Leave a comment